हंडाळवाडी येथे चाकूने भोकसून जीवे मारण्याचा प्रयत्न

पाथर्डी तालुक्यात मिरवणुकीदरम्यान प्रकार
हंडाळवाडी येथे चाकूने भोकसून जीवे मारण्याचा प्रयत्न

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील हंडाळवाडी येथे गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान जुन्या वादाच्या कारणावरून खुन्नस काढून एकावर चाकून भोकसून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि.9) दुपारी घडली.

गणेश दशरथ हंडाळ (रा. हंडाळवाडी, ता. पाथर्डी) असे हल्ला झालेल्या युवकाचे नाव असून हल्ला करणारा याच गावातील अल्पयीन मुलगा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हंडाळवाडी येथे शुक्रवारी दुपारी गणपती विसर्जनाची मिरवणूक आटोपून घराकडे जाणारा गणेश दशरथ हंडाळ याला याच गावातील एका अल्पवयीन मुलाने मागील वादाच्या रागातून मारहाण केली.

‘तू काय गावचा दादा झाला काय? तुला आता संपूनच टाकतो’ असे म्हणून संशयित अल्पवयीन मुलाने गणेश दशरथ हंडाळ याच्या पोटात चाकूने वार केला.पोटामध्ये चाकूचा वार केल्यानंतर गणेश रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडला. उपस्थित नागरिकांनी तातडीने त्यास पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन नगरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गणेशचे वडील दशरथ हंडाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पाथर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com