पारनेर : गोमांस वाहतूक करणारा टेम्पो पकडला
सार्वमत

पारनेर : गोमांस वाहतूक करणारा टेम्पो पकडला

सहा लाख 99 हजारांचा मुद्देमाल जप्त; संगमनेरच्या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

Arvind Arkhade

पारनेर|तालुका प्रतिनिधी|Parner

नगर-कल्याण महामार्गावर असणार्‍या काळेवाडी चेकनाक्यावर बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोमांस वाहतूक करणारा टेम्पो सोमवारी पहाटे जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पारनेर पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बोकील व पोलीस कॉस्टेबल सूरज कदम यांनी ही कारवाई केली आहे.

या अवैध गोमांस वाहतूक प्रकरणी चालक अनिल भाऊसाहेब मंडलिक. क्लिनर गौतम दामोदर झालटे दोघे राहणार संगमनेर या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांंना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत टेम्पो व गोमांसासह सहा लाख 99 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई ही उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

सोमवार 20 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास पारनेर पोलीस ठाणे हद्दीत काळेवाडी चेक पोस्ट येथे वाहनाची ई-पास व बकरी ईदच्या अनुषंगाने पोलीस उपनिरिक्षक बोकील पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम आणि इतर पोलीस कर्मचारी हे तपासणी करत आसताना एक लाल रंगाचा आयशर 1095 क्रमांक चक-04-गण-3725 याची तपासणी केली असता गोवंश मांस वाहतूक करताना आढळून आला.

सहा लाख 99 हजारांचा मुद्देमाल आणि आरोपी चालक अनिल भाऊसाहेब मंडलिक, क्लिनर गौतम दामोदर झालटे (दोघे रा. संगमनेर) त्यांच्या विरुद्ध पारनेर पोलीस स्टेशनला भा.द.वि. कलम 188, 269, 34 व महाराष्ट्र प्राणीसंरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5 (क), 9 (अ) तसेच मो.वा. कायदा कलम 158, 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक बोकील करीत आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com