बनावट नावाने मागणी करून लाखोंची शितपेय लंपास करणारा गजाआड

बनावट नावाने मागणी करून लाखोंची शितपेय लंपास करणारा गजाआड

पारनेर | तालुका प्रतिनिधी

बनावट नावाने मागणी करून लाखोंची शितपेय परस्पर पसार करणारा आरोपीला पारनेर पोलीसांकडून जेरबंद करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून पिकअप गाडी व लंपास केलेली शितपेय असा एकूण दोन लाख ३८ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत सविस्तर महिती अशी की, फिर्यादी वैभव प्रदिप औटी (वय २२ रा. पारनेर) हे चालक म्हणून काम करतात. फिर्यादी माल वाहतूक करीत असतात. दिनांक ०३ मे रोजी त्यांना दिपक औटी (रा. पारनेर) यांनी बोलावून सांगीतले की, टाकळी ढोकेश्वर येथील महावीर सूपर मार्केटमध्ये शितपेयाची ऑर्डर आहे. ते मागणी प्रमाणे लोड करून टाकळी येथे डिलीव्हरी करून या. त्यावेळी त्यानी वेगवेगळया कंपनीचे १,३२,४०० रूपयाचे शितपेय लोड केले.व टाकळी ढोकेश्वर येथे पाठवून दिला.

बनावट नावाने मागणी करून लाखोंची शितपेय लंपास करणारा गजाआड
Gautami Patil Video : गौतमी पाटीलचा डान्स सुरू झाला अन् पत्र्याचं शेड कोसळलं, दुर्घटना कॅमेऱ्यात कैद

यातील आरोपीत यांनी शासकिय रुग्णालय टाकळी ढोकेश्वर येथे आधीच पिकअप वाहन आणून सुदर्शन किराणा स्टोअर्स समोर येवून थांबले होते. आरोपीत यांनी फिर्यादींचा टेम्पो अडवून महावीर सुपर शॉप में मालकाने अर्धा माल पिकअप मध्ये खाली करण्यास सांगीतला आहे. व उर्वरित सूपर शॉपमध्ये जावून खाली करा व पैसे महावीर शॉप मधून घेवून टाका असे सांगीतले.

फिर्यादी यांनी विश्वास ठेवून त्यांना माल टेम्पो मधून काढून दिला. महावीर सुपर शॉप येथे जावन अर्धा माल कूठे खाली करू असे विचारलेवर तेथील चेतन भंडारी यांनी मालाची मागणी केली नसल्याचे सांगीतल्यावर फिर्यादी यांना फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. वैभव ओटी यांनी घडलेली सर्व हकीकत त्यांचे मालक दिपक औटी यांना दिली. दिपक औटी यांना मागणी झालेल्या मोबाईल कमांकावर फोन केला असता तो स्विच ऑफ आला.

बनावट नावाने मागणी करून लाखोंची शितपेय लंपास करणारा गजाआड
Accident : प्रवाशांसह बस पैनगंगा नदीत कोसळली, महिला प्रवाशाचा मृत्यू तर १७ जण जखमी

त्यानंतर फिर्यादी यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला. त्यामध्ये घटनास्थळाने आजूबाजूचे सिसिटिव्ही कॅमेरे चेक करण्यात आले. कॉल डिटेल्स घेण्यात आले व आरोपीत याचे टोल नाका येथे सिसिटिव्ही चेक केले परंतू टैम्पो आरोपीत यांनी टोल नाक्यावर न नेता आडमार्गाने नेला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर गोपनीय साक्षीदार व तांत्रिक तपास वरून आरोपीत शेवगाव तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले व त्याचे नाव दिपक गणेश गुगळे असून वडुले गावाचा असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपीला मिरी माका गावाच्या शिवारात अंधारात पाठलाग करून ताब्यात घेतले. सुरूवातीस त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु नंतर त्याने गुन्हयात वापरलेली पिकअप गाडी व फसवणूक करून नेलेली शितपेय असे एकुण २,३८,०९० रुपयेचा मुददेमाल काढून दिला. व उर्वरित मुददेमाल त्यांचे साथीदार ऋषीकेश कंजारी गचेवाडी (ता. शेवगाव) ओमकार गुंजाळ, जयेश संदिप खरमाळे (रा. भांडगाव, ता. पारनेर) यांनी विकल्याचे कबुली दिली.

बनावट नावाने मागणी करून लाखोंची शितपेय लंपास करणारा गजाआड
शिर्डीत ६ हॉटेलवर छापा, १५ पीडित मुलींची सुटका

तसेच पांढरी पूलावर सुमारे एक लाख रुपये किमतीचे लिवागार्ड सेंटरी व इन्व्हर्टर अशाच प्रकारे फसवणूक करून पळवून नेल्याने तपासात कबुली दिली. सदर बाबत सोनई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हयाची नोंद असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com