१० लाखासाठी भाडेकरूनेच केला घरमालकाच्या अपहरणाचा प्रयत्न, पण...

१० लाखासाठी भाडेकरूनेच केला घरमालकाच्या अपहरणाचा प्रयत्न, पण...

जामखेड | तालुका प्रतिनिधी

दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी (ransom) भाडेकरूनेच घरमालकाचे मध्यरात्री घरात घुसून अपहरण (Kidnapping) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना जामखेडमध्ये (Jamkhed) घडली आहे. मात्र आरोपींचा हा प्रयत्न फसला असून जामखेड पोलिसांनी (Jamkhed Police) अवघ्या दोन तासात तीन आरोपींपैकी दोन आरोपीना अटक केली आहे. त्या आरोपींना न्यायालयात (Court) हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी (Police Custody) देण्यात आली आहे.

१० लाखासाठी भाडेकरूनेच केला घरमालकाच्या अपहरणाचा प्रयत्न, पण...
Video : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा आत्महत्येचा इशारा..; आमदार लंकेंकडे बोट?

याबाबतसविस्तर माहिती अशी की, फिर्यादी घरमालक कृष्णा अशोक साळुंके (वय २३ वर्ष धंदा शिक्षण रा. बीड रोड जामखेड) हा दि. १९ रोजी रात्री आपल्या घरी झोपला आसताना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास त्याच्या घराचा दरवाजा कोणीतरी अज्ञात दोन व्यक्तींनी वाजवला. या वेळी दिड वर्षापासुन फीर्यादीच्या घरातील रुम भाड्याने राहणाऱ्या आरोपी योगेश शहादेव शिंदे याने गेटचा दरवाजा उघडला. यानंतर दोन आरोपींनी माझ्या घरात येऊन माझे हात पाय बांधुन, तोंडाला रूमाल बांधुन व गळ्याला चाकु लावून एम एच १२ एफ के ३८९७ या चारचाकी वाहनात मागच्या सिटवर बसवुन म्हणाले की, कृष्णा याने दहा लाख रूपये दिले नाही तर त्यास ठार मारून टाकू. हे सर्व फीर्यादी कृष्णा याने गाडीत ऐकले होते.

या नंतर फीर्यादी याने कसेतरी गाडीतुन आपली सुटका करुन घेतली व बीड रोडवरील आपल्या घराजवळ आरडाओरड केली. मात्र तरी देखील भाड्याने रहात आसलेल्या आरोपी योगेश शिंदे यांने फीर्यादी घरमालकास दम दिला की, तु गाडीत येऊन बस नाहीतर तुझ्या आईला ठार मारु. या नंतर शेजारी रहाणारे लोक धावत बाहेर आले. त्यामुळे आरोपी योगेश शिंदे (रा. सौताडा ता. पाटोदा जिल्हा बीड) व त्याचे दोन साथीदार घटनास्थळाहुन पळुन गेले. या प्रकरणी फिर्यादी कृष्णा साळुंके याने दिलेल्या फिर्यादीवरून एकुण तीन आरोपींन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींना लपुन बसलेल्या नागेश शाळेच्या पाठीमागील भागातील एका घरातुन अटक केली. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, डी वाय एस पी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, पो ना. अविनाश ढेरे, पो कॉ संग्राम जाधव,आबासाहेब आवारे,अरुण पवार, संदीप राऊत, पो कॉ संदीप आजबे, पो कॉ विजय कोळी चालक पो हे. कॉ. हनुमान आरसुल, महिला पोलीस मनीषा दहिरे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com