ग्रामसभेत घातला गोंधळ; दोघे गजाआड तर एक फरार

ग्रामसभेत घातला गोंधळ; दोघे गजाआड तर एक फरार

पैठण | प्रतिनिधी

३१ मार्च अखेरच्या अनुदान आणि ग्रामविकास निधीचा खर्च आणि ताळमेळ संदर्भात आणि विविध विकास कामाबाबत पिंपळवाडी ग्रामपंचायतमध्ये (Pimpalwadi Gram Panchayat) पुर्ण क्षमतेने ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित असताना ग्रामसभेच्या (Gram Sabha) कामकाजात अडथळा निर्माण करीत गावातील त्रिकुटाने गोंधळ घातला आणि अश्लील शिवीगाळ करीत ग्रामसभा तहकूब केली. प्रसंगाचे भान राखून ग्रामसेवक बबन गव्हाणे यांनी तात्काळ पिंपळवाडी पोलीस ठाणे गाठून सरकारी कामात अडथळा अशी फिर्याद दाखल केली.

ग्रामसभेत घातला गोंधळ; दोघे गजाआड तर एक फरार
Prarthana Behere : पांढऱ्या नक्षीदार साडीतला 'प्रार्थना'चा मोहक लूक, पहा फोटो

याबाबत अधिक माहिती अशी की, ३० मार्च रोजी पिंपळवाडी ग्रामपंचायतमध्ये विविध विकास योजना व शासकीय योजना प्रणाली या विषयावर सरपंच, उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थ अशी ग्रामसभा बोलवण्यात आली होती. विविध विषयांवर चर्चा सुरू असताना अचानक मयूर अशोक चाबुकस्वार, जावेद हकिम शेख, आणि वजीर याशीन पठाण हे त्रिकुट सभेत घुसले आणि स्वस्त धान्य दुकानात प्रचंड प्रमाणात अपहार सुरू आहे ते दुकान बंद करून आमचा नवीन प्रस्ताव घ्या, तेव्हा सरपंच हदिहंडे ग्रामसेवक गव्हाणे यांनी समजून सांगण्याचे प्रयत्न केले.

ग्रामसभेत घातला गोंधळ; दोघे गजाआड तर एक फरार
Amruta Khanvilkar : 'अप्सरा हो तुम, या कोई परी'! अमृताचं निळ्या साडीतील भुरळ घालणारं सौंदर्य

मात्र या त्रिकुटाने समस्त सभेला अश्लील शिवीगाळ करीत सरकारी दस्तऐवज उधळून लावले अशी तक्रार ग्रामसेवक गव्हाणे यांनी पिंपळवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ठाणेआमलदार खंडू मंचरे यांनी फिर्याद भा. द. वि ३५३ कलमे लावून दाखल करून घेतली आणि तात्काळ आरोपी मयूर चाबुकस्वार, जावेद हकीम शेख या दोघांना मोठ्या शिताफीने अटक केली तर वजीर फरार झाला आहे. भागवत नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल भदरगे, दिलीप चौरे, पुढील तपास करत आहेत.

ग्रामसभेत घातला गोंधळ; दोघे गजाआड तर एक फरार
हॉलिवूड सुपर स्टार 'ब्रूस विलिस'चा चित्रपट सृष्टीला अलविदा!... धक्कादायक कारण आले समोर

Related Stories

No stories found.