नेवाशात ५ विवाह ठग जेरबंद

लग्नासाठी मुलगी दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न
नेवाशात ५ विवाह ठग जेरबंद
जेरबंद

नेवासा (शहर प्रतिनिधी)

लग्नासाठी मुलगी दाखवून मुलाच्या कुटूंबियांकडून सव्वा लाख रुपये उकळून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्याची घटना नेवासा येथे घडली. याबाबत जालना जिल्ह्यातील विवाहेच्छुक युवकाच्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना नेवासा न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

जेरबंद
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

याबाबत विजय देविदास पवार (वय २५) धंदा- मजुरी रा. लोधी मुहल्ला जालना याने फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी जालना शहरात आई, भाऊ, भावजयी आदींसह एकत्र कुटूंबात राहत असून शहरात आरओ फिल्टरचे मजुरीने काम करतो. माझी बहिण मनिषा विष्णु ब्राम्हणे ही तीर्थपुरी ता. घनसांगवी जि. जालना येथे राहतात. माझी बहिण मनिषा हिने तिच्या गावातील परिचित असलेल्या ओमकार भानुदास कासार याला माझ्या लग्नासाठी मुलगी पाहण्यास सांगितले होते. ओमकार कासार याने एक मुलगी असून नेवासा येथे जावे लागेल. मुलीच्या नातेवाईकांना लग्नासाठी १ लाख २० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्याप्रमाणे ठरवून मी व माझी बहिण मनिषा तिची सासू वच्छला, ओमकार भानुदास कासार व त्याचा मित्र रावसाहेब नारायण वानखेडे असे आम्ही खासगी वाहनाने ३१ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता निघून नेवासा येथे बसस्थानाकजवळ आलो.

जेरबंद
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

नेवाशात आल्यावर आम्ही ओमकार कासार यास म्हणालो की आम्हाला मुलगी व तिचे नातेवाईक दाखवा. त्यावर मी माझ्याकडे रोख पैसे नाहीत घरी गेल्यानंतर देतो, असे म्हणालो. परंतु ओमकार कासार हा आम्हाला मुलगी व तिचे नातेवाईक दाखवित नव्हता म्हणून मी नेवासा येथे मिनी बँकेमध्ये माझ्या खात्यावरील पैसे काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पैसे निघाले नाहीत. त्यानंतर ओमकार कासार याने एका महिलेला फोन करुन बसस्थानकासमोर बोलावून घेतले. त्यावेळी तेथे दोन महिला व एक मुलगी आली व त्याने आमच्याबरोबर ओळख करून दिली. त्यावेळी त्याने आम्हाला प्रथम मुलीचे नाव कोमल राजू साठे, तिची मावशी संगिता वसंत जाधव रा. पैठण जि. औरंगाबाद व दुसरी महिला सुमन रमेश वाघमारे रा. हडपसर (पुणे) असे असल्याचे सांगितले.

जेरबंद
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

मुलगी दाखविताच ते पैशाची घाई करु लागले. मुलीने आई-वडील नाहीत. मावशी संगिता जाधव माझे लग्न करून देणार असल्याचे सांगितले. त्यांच्या वागण्याबाबत संशय आल्याने व माझी फसवणूक होईल, असे वाटू लागल्याने मी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी सुमन वाघमारे ही आम्हाला म्हणाली की, आम्ही आमच्यासोबत अजुन चार मुली आणलेल्या आहेत. त्याचेवर तुम्ही अतिप्रसंग करत आहात म्हणून आरडाओरडा करु गुपचूप आमचे ठरलेले १ लाख २० हजार रुपये द्या. त्यावेळी आमची फसवणूक झालेली आहे, अशी आमची खात्री झाली म्हणून आम्ही नेवासा पोलीस ठाण्यास संपर्क केला व पोलीस आम्हास पोलीस स्टेशनला घेवून आले.

जेरबंद
विशाल निकम ठरला Bigg Boss Marathi 3 चा विजेता, जाणून त्याच्याविषयी...

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी ओमकार भानुदास कासार याचे सांगणेवरून त्याचेबरोबर त्याचा जोडीदार रावसाहेब नारायण वानखडे दोघे रा. तिर्थपुरी ता. घनसांगवी जि. जालना असे खासगी गाडीने आलो असता तेथे महिला कोमल राजू साठे (नाव खोटे असावे), संगिता वसंत जाधव रा. पैठण, जि. औरगाबाद, सुमन रमेश वाघमारे रा. हडपसर, ता. हवेली, जि. पुणे यांच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ४२०, १२० ब ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार तुळशीराम गिते हे करत आहेत.

जेरबंद
भाग्यश्रीच्या मनमोहक अदांची चाहत्यांना पडली भुरळ, पाहा फोटो

अतिप्रसंग करत असल्याबाबत आरडाओरडा करण्याची धमकी

नेवासा बसस्थानकाजवळ जालना जिल्ह्यातील युवक व त्याच्या नातेवाईकांना बोलावून घेतल्यानंतर मुलगी दाखवून लगेच पैसे देण्याचा दबाव आरोपींनी टाकला. मात्र फसवणुकीची शंका वाटल्याने पैसे देण्यास नकार दिल्याने पैसे द्या अन्यथा आमच्याबरोबर अशा आणखी चार मुली असून त्या सर्वांवर तुम्ही अतिप्रसंग करत आहात असा आरडाओरडा करु, अशी धमकी आरोपींनी युवक व त्याच्या नातेवाईकांना दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com