नेवासा पोलिसांनी डिझेल चोरी करताना अल्पवयीन मुलास पकडले

नेवासा पोलिसांनी डिझेल चोरी करताना अल्पवयीन मुलास पकडले

नेवासा | का.प्रतिनिधी

नेवासा पोलिसांनी कोषागार कार्यालय आवारात जप्त करून ठेवलेल्या वाहनांपैकी एका टेम्पोतून डिझेल चोरी करताना एका अल्पवयीन मुलास रंगेहात पकडले असून त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सहायक फोजदार सुरेश दत्तात्रय शिंदे यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, जप्त केलेली वाहने ही नेवासा तहसील कार्यालयाचे आवारात व काही वाहने कोषागर कार्यालय नेवासा समोर पटांगणात उभी केलेली आहेत.

4 ऑगस्ट रोजी सायंकाळी कोषागार कार्यालय नेवासा येथील कार्यालयाचे पटांगणात जप्त केलेल्या वाहनापैकी एका टॅम्पो मधुन एक मुलगा डिझेल टॅकमधुन पाईप टाकुन एक प्लॅस्टीकचे ड्रममध्ये डिझेल काढत आहे असे कळविलेवरुन मी व हवालदार टी. बी. गिते, पोलीस नाईक आर. एम केदार, पी.बी. दहिफळे, वाय सी आव्हाड यांना तो डिझेल काढताना मिळुन आला. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता तो अल्पवयीन (वय 16) रा. नेवासा खुर्द असल्याचे समजले. त्याच्याकडे एका प्लॅस्टीकचे ड्रममध्ये 15 लिटर डिझेल किंमत अंदाजे 1455/ मिळून आल्याने त्याचेविरुदध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com