
नेवासा | तालुका प्रतिनिधी
शासकिय कर्तव्य करत असतांना बाईक चालकाने जोराने धक्का दिल्याने डांबरी रोडवर पडून नेवासाचे पोलीस निरीक्षक विजय करे हे जखमी झाले आहे. ही घटना शनिवार (दि.३) रोजी दुपारी ज्ञानेश्वर कॉलेजच्या गेट जवळ घडली.
याबाबत पोलीस शिपाई दिलीप रामा कु-हाडे (वय 46 वर्ष) यांनी नेवासा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादित म्हंटले आहे की, दि. 03 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 4 वाजेचे सुमारास सरकारी वाहनातून शेवगाव पोलीस स्टेशनवरुन नेवासा पोलीस ठाण्याकडे पोलिस निरीक्षक विजय करे यांना घेवून येत असताना नेवासा फाटा ते नेवासा रोडवर ज्ञानेश्वर कॉलेज समोर रस्यावर पांढरे रंगाची बिना नंबरची बाईक व त्यावर दोघे जण बसून होते.
मागील महीन्यात ज्ञानेश्वर कॉलेज येथे घडलेल्या भांडणाच्या घटनेच्या अनुषंगाने त्यांच्याकडे विचारपुस करणे करीता करे यांनी गाडी थांबविण्यास सांगीतले व गाडीतून खाली उतरुन त्यांचे विना नंबरचे वाहनाबाबत व येथे का थांबलात? याबाबत विचारपुस करीत असतांना सदर बाईकचा चालक यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव गाव न सांगता त्याने रेसर बाईक भरधाव"वेगाने पळवून पोलीस निरीक्षक यांना जोराने धक्का देवुन नेवासा खुर्द गावाच्या दिशेने पळुन गेले. त्यावेळी पोलीस निरीक्षक हे डांबरीवर खाली पडुन जखमी झाले. तेव्हा तेथे उपस्थीत असणारे विदयार्थी त्यांना तेथून पळून गेलेल्या इसमांचे नाव विचारले असता त्यांनी सांगीतले की गाडी चालवत असणारा अरमान जावेद बागवान रा.नेवासा बु व त्याच्या पाठीमागे बसलेला इसम अरबाज रियाज सय्यद रा. नेवासा खु असे दोघे होते.
त्यानंतर पोलिस निरीक्षक करे हे धक्का दिल्याने डांबरी रोडवर पडुन जखमी झाल्याने त्यांना औषधोपचार करीता ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे घेऊन गेलो. या फिर्यदिवरुन अरमान जावेद बागवान रा.नेवासा बु ता. नेवासा व अरबाज रियाज सय्यद रा. नेवासा खु ता.नेवासा यांचे विरुध्द भारतीय दंड विधान कलम 353,279, 337 सह मोटार वाहन कायदा कलम 184,50(1)/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.