चोरट्यांनी भरदिवसा घर फोडले

चोरट्यांनी भरदिवसा घर फोडले

गणेशवाडी | वार्ताहर

नेवासा तालुक्यातील सोनई-घोडेगाव रोडवर मुळा कारखाण्याजवळ शिवाजी अनारसे यांचे घरी कुणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी भर दिवसा दुपारी चारच्या सुमारास घराचे व दुकानचे कुलुप तोडून हात साफ केला.

घरमालक शिवाजी अनारसे हे कारखाना येथे नोकरी निमित्त तर त्यांच्या पत्नी नगर येथे नोकरी निमित्त गेले असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून आतील सामानाची उचकापाचक करत त्या ठिकाणी काही हाती न लागल्याने चोरट्यांनी जवळीलच दुकानचे शेवटचे कुलुप तोडून आतील किरकोळ रक्कमेवरच समाधान मानत त्या ठिकाणावरुन काढता पाय घेतला.

भर दिवसा होणाऱ्या चोऱ्यांचा बंदोबस्त करण्याकामी सोनई पोलीस अपयशी ठरत असल्याने परिसरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.