२७० क्विंटल साखरेचा अपहार करुन परस्पर विल्हेवाट; जळगावच्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

२७० क्विंटल साखरेचा अपहार करुन परस्पर विल्हेवाट; जळगावच्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

नेवासा | तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील भेंडा (Bhenda) येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना (Loknete Marutrao Ghule Patil Dnyaneshwar Sahakari Sakhar Karkhana)....

येथून उचलली साखर सांगितलेल्या व्यापाऱ्याकडे खाली न करता वाहान चालकांशी संगनमत करून अंदाजे २७० क्विंटल साखरेचा अपहार केल्या प्रकरणी जळगाव येथील व्यापारी व दोन गाडी चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फलटण (जि.सातारा) येथील साखरेच्या व्यापारी सौ.मंजुश्री महेश करवा (वय-३६ वर्षे) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात मनोज गोकुळदास मानुधने (रा एरंडोल ता.एरंडोल जि.जळगाव) व दोन्ही गाड्यांवरील चालक (नाव पत्ता माहीती नाही) यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील करत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com