भयंकर! लहान मुलाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून

जिल्ह्यातील 'या' तालुक्यातील घटना
भयंकर! लहान मुलाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

तालुक्यातील वरखेड (Warkhed) येथे एका दहा वर्षीय मुलाची दगडाने डोके ठेचून हत्या करण्यात आली. मंगळवारी रामडोह रस्त्याच्या (Ramdoh Road) पाटचारी परिसरात डोके छिन्नविच्छिन्न केलेल्या अवस्थेत मुलाचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलिसांनी (Newasa Police) घटनास्थळी धाव घेतली. सोहम उत्तम खिलारी (वय 10 वर्षे) (Soham Uttam Khilari), राहणार बुलढाणा (Buldhana), (हल्ली वरखेड, ता. नेवासा) असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे. मयत सोहम हा गेल्या आठ-नऊ वर्षांपासून आपल्या दोन भाऊ व आईसह सावत्र वडिलांसमवेत वरखेड येथे वास्तव्यास होता.

दरम्यान सोहमचा मृतदेह आज पहाटे रामडोह रस्त्यालगतच्या पाटचारी परिसरातील रस्त्याचे कडेला छिन्नविच्छिन्न अवस्थेत परिसरातील लोकांना दिसला. या घटनेची माहिती लोकांनी नेवासा पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय करे (police inspector Vijay Kare), पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल (PSI Samadhan Bhatewal) यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनस्थळी जाऊन पाहणी केली. पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital Newasa Fata) दाखल केला.

मयत सोहमचा आई व सावत्र वडील समाधान यांच्याकडून नेहमीच छळ होत असल्याची चर्चा वरखेड गावात ऐकायला मिळत आहे. दहा वर्षीय बारकू हा आपली पोटाची भूक भागविण्यासाठी वेळप्रसंगी गावात भाकरी मागत होता. अशीच माहिती समोर आली आहे. त्याचा स्वभाव खूपच गरीब होता. तो नेहमी भीतीच्या सावटात वावरत असल्याचेही ग्रामस्थ म्हणतात. त्यामुळे त्याची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यासारखे बाहेरचे कोणीही असण्याची शक्यताच नाही. पोलिसांचाही तसाच कयास आहे. खरी माहिती तपासाअंतीच समोर येईल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com