श्रीसंत नागेबाबा मंदिर कार्यालयाची खिडकी तोडून चोरी

श्रीसंत नागेबाबा मंदिर कार्यालयाची खिडकी तोडून चोरी

भेंडा | वार्ताहर

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्रीसंत नागेबाबा मंदिर कार्यालयाच्या खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी कार्यालयातील लॉकर तोडल्याची घटना काल मंगळवारी रात्री घडली आहे.

सदरची घटना सकाळी दर्शनासाठी मंदिरात आलेल्या भाविकांच्या लक्षात आल्याने त्यांनी मंदिर प्रशासनास कळविले. मंदिर कार्यालय व स्टोअर रूम या दोन इमारतीच्या बोळीत असलेली खिडकीचे सुरक्षा गज कापून आतील स्लाइन्डिंग खिडकी खोलून अज्ञात चोरट्यांनी कार्यालयात प्रवेश मिळविल्याचे स्पष्ट झाले. आतमध्ये असलेले लॉकर तोडले आहे.

याबाबद नेवासा पोलिसांना खबर देण्यात आली असून कार्यालय उघडून प्रत्यक्ष पाहणी केल्यावरच चोरीचा पुढील तपशील समजणार आहे. यापूर्वी ही मंदिरातील दानपेटी चोरीला जाण्याची घटना घडलेली आहे. त्यामुळे मंदिराच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com