महिलेच्या विनयभंगप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महिलेच्या विनयभंगप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

एक 48 वर्षीय महिला जेवणाचा डबा घेऊन पायी चालत होती. तेव्हा सुरेश झारेकर याने तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. ही घटना राहुरी तालुक्यात दि. 7 जानेवारी रोजी घडली.

त्या 48 वर्षीय महिलेने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 7 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजे दरम्यान महिला तिच्या मुलाचा जेवणाचा डबा घेऊन त्यांच्या किराणा दुकानाकडे जात होती. यावेळी तिच्या घरासमोर सुरेश झारेकर याने त्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच शिवीगाळ केली. तू आता माझ्या तावडीतून वाचलीस. पुढच्या वेळेस तुझा बेतच पाहतो. अशी धमकी दिली. त्यावेळी तीन आरोपींनी मिळून त्या महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्या महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी सुरेश भास्कर झारेकर, भास्कर सयाजी झारेकर व संगिता सुरेश झारेकर या तिघांवर मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक अमित राठोड हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com