लग्नाचे अमिषाने व्यावसायिकाचा महिलेवर अत्याचार

पिडीताची कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद
लग्नाचे अमिषाने व्यावसायिकाचा महिलेवर अत्याचार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार (Torture by showing lust for marriage) केल्याप्रकरणी येथील एका व्यावसायिकावर कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) अत्याचार, फसवणूकीच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. खुशाल ठारूमल ठक्कर (रा. दुधसागर सोसायटी, केडगाव) असे गुन्हा दाखल (Filed a crime) झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. मुळची जळगाव जिल्ह्यातील (Jalgav District) व सध्या नगरमध्ये राहणार्‍या महिलेने फिर्याद दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील (Jalgav District) महिलेची ठक्करसोबत ओळख होती. ती महिला विवाहित असून तिला एक मुलगा व एक मुलगी आहे. ठक्कर याने महिलेच्या मुलाला त्याच्या दुकानात काम दिले होते. ठक्कर याचे त्यांच्या घरी येणे जाणे होते. त्याने फिर्यादी महिलेला लग्नाचे अमिष (Lure of Marriage) दाखविले व त्यांचे कुटुंब नगरमध्ये आणले. ते कुटुंब त्याच्या घरामध्ये राहत होते.

एप्रिल 2019 पासून ऑक्टोबर 2021 पर्यंत ठक्कर याने फिर्यादी महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. तुझ्याशी लग्न करणार नाही, कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या मुलांना जिवंत सोडणार नाही, नगरमध्ये राहून देणार नाही, अशी धमकी ठक्कर याने पिडीत महिलेला दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com