चार हातभट्ट्यांवर एलसीबीची छापेमारी

चौघांना अटक
चार हातभट्ट्यांवर एलसीबीची छापेमारी

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmedagar

स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिसांकडून पारनेर (Parner) तालुक्यात अवैध दारू (illegal alcohol) अड्यांवर कारवाई सुरूच आहे.

पोलिसांनी गुरूवारी चार ठिकाणी छापेमारी करून गावठी दारू (gavathi alcohol), कच्चे रसायन, तयार हातभट्टी दारू, दुचाकी असा एक लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चार जणांविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात (Parner Police Station) गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

विजय बाजीराव भागवत (वय ५८ रा. कान्हूर पठाण), स्रोनू नथू गायकवाड (वय २२) काळू उमाजी पवार (दोघे रा. वडगाव दर्या), शिवाजी लहानू चोरे (वय ४० रा. डोंगरगण, टाकळी हाजी ता. शिरूर जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपअधीक्षक अजित पाटील यांनी अवैध दारू अड्यांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, दत्तात्रय हिंगडे, राहुल सोळुंके, रोहिदास नवगिरे, आकाश काळे, संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com