दोन लाख लुटीचा बनाव कोतवालीकडून पाच तासात उघड
Picasa
सार्वमत

दोन लाख लुटीचा बनाव कोतवालीकडून पाच तासात उघड

तीन आरोपींना अटक

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

ट्रासपोर्ट टेम्पोवरील चालकाकडे पुणे येथून माल आणण्यासाठी मालकाने दिलेले एक लाख 97 हजार रूपये लुटले असल्याची फिर्याद देण्यासाठी कोतवाली पोलिसांकडे गेलेल्या चालकाचा बनाव पोलिसांनी पाच तासात उघड केला.

या लुटीच्या बनावात टेम्पो चालकासह त्याला मदत करणारे दोघांना पोलिसांनी अटक केली. तर, एका अल्पवयीन बालकास ताब्यात घेतले आहे. टेम्पो चालक प्रदीप सोन्याबापू शिरसाठ (रा. गंगादेवी ता. आष्टी जि. बीड), साहील जामदार शेख (रा. बोल्हेगाव, नगर), प्रकाश चंद्रकांत भाकरे (रा. नागापूर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. याप्रकरणी ट्रासपोर्ट व्यवसायिक शरद दशरथ रोडे (वय- 34 रा. नागापूर) यांनी फिर्याद दिली होती.

फिर्यादी यांचा ट्रासपोर्टचा व्यवसाय आहे. फिर्यादी यांनी टेम्पो (क्र. एमएच- 16 सीसी- 7594) वरील चालक प्रदीप शिरसाठ याला पुणे येथून नवीन एक्साईट बॅट्री आणण्यासाठी गुरूवारी पहाटे चार वाजता एक लाख 97 हजाराची रक्कम दिली होती. शिरसाठ याने पाच वाजता फिर्यादी यांना फोन करून सांगितले की, केडगाव येथील कांदा मार्केट जवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मला अडवून टेप्मोची काच फोडली व माझ्याकडील एक लाख 97 हजार रूपयांची रक्कम लुटून नेली.

झालेला प्रकार शिरसाठ याने कोतवाली पोलिसांकडे सांगितला असता यामध्ये तफावत आढळून आली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता मी या घटनेचा बनाव केला असल्याची कबूली शिरसाठ याने दिली. यासाठी साहील शेख, प्रकाश भाकरे व एक अल्पवयीन मुलाची मदत घेतली असल्याचे शिरसाठ याने पोलिसांना सांगितले. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, सहाय्यक निरीक्षक नितीन रणदिवे, उपनिरीक्षक सतीष शिरसाठ व त्यांच्या पथकातील कर्मचार्‍यांनी केला.

Deshdoot
www.deshdoot.com