चोरट्यांनी फोटोग्राफीचे दुकान फोडलं, ५० हजारांचा ऐवज लंपास

चोरट्यांनी फोटोग्राफीचे दुकान फोडलं, ५० हजारांचा ऐवज लंपास

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील पढेगाव येथील छायाचित्रकार विजय सुनील गोल्हार यांचे फोटोग्राफीच्या दुकानांचा मागील दरवाजा तोडून आतील सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी अज्ञातच चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यामुळे पढेगाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पढेगाव येथे फिर्यादी विजय गोल्हार यांचे 'हिंदवी फोटोग्राफी' नावाचे छायाचित्रकारीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानावर पाळत घेऊन अज्ञातच चोरट्याने दुकानांचे मागील दरवाजाचे कुलूप तोडून दि. ७ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास आतील ३० हजार रुपये किमतीचा संगणक, त्यास एच. पी. कंपनीचा २४ इंची स्क्रीन असलेला सी. पी. यू. त्यास ८ जी.बी. रँप, दोन हार्ड डीक्स ग्राफिक्स कार्ड्स, असलेला जुना वापरता. तर २० हजार रुपये किमतीचा एफसोन कंपनीचा प्रिंटर असा एकूण ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

या प्रकरणी फिर्यादी गोल्हार यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातच चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी प्रभारी पोलीस अधिकारी सुरेश आव्हाड यांनी भेट दिली आहे. याबाबत तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील प्रभारी पोलीस निरीक्षक आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सी. बी. काळे हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com