धक्कादायक! आजोबा ठरला राक्षस, पाच वर्षीय नातवाचा केला निर्घुण खून

कोपरगाव तालुक्यात खळबळ
धक्कादायक! आजोबा ठरला राक्षस, पाच वर्षीय नातवाचा केला निर्घुण खून

चासनळी | वार्ताहर

लहान मुलं आई वडीलांपेक्षा जास्त आपल्या आजी-आजोबांच्या मांडीवर खेळताना दिसतात. मात्र एका घटनेने आजोबांच्या नावाला काळीमा पुसला गेला आहे.

एका निर्दयी आजोबाने (grandfather) आपल्या पाच वर्षाच्या नातवाचा जीव घेतल्याची घटना कोपरगाव तालुक्यात घडली आहे.

कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील तीन चारी वस्ती येथे हा धक्कादायक प्रकार घडला. आई-वडील संभाळत नाही म्हणून आजोबाकडे असलेल्या नातवाचा ६० वर्षीय आजोबाने गुरुवारी रात्री निर्घुण खून केला.

गावातील अज्ञात व्यक्तीने पोलीस स्टेशनला करून सदर घटनेची माहिती दिली. त्यानुसार गोदावरी नदी काठी पुरलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून सदर आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

Related Stories

No stories found.