सासर्‍याकडून जावयाचा खून

सुरेगाव शिवारातील घटना
सासर्‍याकडून जावयाचा खून

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Ahmednagar

घरगुती भांडणाचे कारणावरून सवत झुंबरबाई बाबुराव निकम यांचा मुलगा प्रफुल्ल बाबुराव निकम व झुंबरबाईचे वडील सोपान लक्ष्मण कोपरे रा. सुरेगाव यांनी मिळून बाबुराव छबुराव निकम यांना शस्त्राने डोक्यात तसेच शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण करून जीवे ठार मारले. ही घटना सुरेगाव ते कोळगाव थडी येथे घडली. याबाबत मयताची दुसरी पत्नी लताबाई निकम यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसानी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी लताबाई बाबुराव निकम रा. सुरेगाव यांचे पती बाबुराव छबुराव निकम याच्याशी नेहमी होणारे घरगुती भांडणाचे कारणावरून सवत झुंबरबाई बाबुराव निकम यांचा मुलगा प्रफुल्ल बाबुराव निकम, झुंबरबाईचे वडील सोपान लक्ष्मण कोपरे यांनी मिळून बाबुराव छबुराव निकम यांना सुरेगाव शिवारात सुरेगाव ते कोळगाव थडी जाणारा कच्या रोडवर संजय दामोदर निकम यांचे उसाचे शेताजवळील नालीत काहीतरी टनक शस्त्राने डोक्यात तसेच शरिरावर वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण करून जबर जखमी करून जीवे ठार मारले. याप्रकरणी सोनू उर्फ प्रफुल्ल बाबुराव निकम व सोपान लक्ष्मण कोपरे या दोघांवर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भादंवी कलम 302, 323,34 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com