
कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
शहरातील कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी जुनी बिल्डिंग पडण्याचे काम अंतिम टप्प्यात असतांना त्याच ठिकाणी शेजारी असलेल्या रसरंग हॉटेलची भिंत पडण्याच्या करणावरून शनिवारी दोन गटात तुफान हाणामार्या झाल्या. यामुळे विघानेश्वर चौकात काहीकाळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या पहिल्या फिर्यादीत प्रतिक संजय साबळे रा. खडकी यांनी म्हंटले आहे, आरोपी प्रतिक सुभाष कदम, तुषार भाऊसाहेब गायकवाड व त्यांचे सोबत इतर पाच ते सहाजन नाव,गांव माहीती नाही. यांनी हॉटेल रंसरंगचे भिंत पाडण्याचे कारणावरुन माझेशी वाद घातला. त्यास विरोध केला असता, आरोपी यांनी हॉटेल रसरंगचे काउटर फोडुन नुकसान करुन मला लाथाबुक्यांनी व लोखंडी रॉडने डावे हातावर, पायावर मारहान करुन गंभीर जखमी करुन शिवीगाळ केली आहे. प्रतीक साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भारतीय दंड विधान कलम 324, 143, 147, 148, 149, 323, 441,427, 504 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
दुसर्या फिर्यादीत तुषार भाऊसाहेब गायकवाड रा. अनकुटे ता.येवला यांनी म्हंटले आहे, आम्ही विघ्नेश्वर चौकातील अनकुटे बिल्डींग येथे बिल्डींग पाडलेल्या ठिकाणी राहीलेले काम करीत असताना त्या ठिकाणी यातील आरोपी प्रतिक संजय साबळे, संजय साबळे, अमितेश साबळे, परीणीत साबळे, रामदास निवृत्ती अभंग व इतर तीन ते चार जन त्यांचे नाव गाव माहीती नाही यांनी येवुन या ठिकाणी कोणतेही शॉपींग सेटर होणार नाही. तुम्ही आमचे रसरंग हॉटेलजवळ आलेच कसे असे म्हणुन वाद घातला.
तेव्हा मी आरोपीस समजावुन सांगत असतांना, आरोपी क्र.1 ते 3 यांनी त्यांचे हातातील लोखंडी रॉडने प्रतिक कदम यांचे पोटावर डावे बाजुला, हातावर, पायावर मारुन त्यांना गंभीर जखमी केले. तेव्हा मी सोडवा सोडव करत असतांना, आरोपींनी मला लाथाबुक्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करुन तुम्ही येथुन निघुन जा नाहीतर तुम्हांला आम्ही जिवंत सोडणार नाही असे धमकी दिली. तुषार भाऊसाहेब गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन आरोपींविरुद्ध भादवि कलम 324, 143, 147, 148, 149, 323, 504 प्रमाणे गुन्हा रजि दाखल आहे. घटनेचा पुढील तपास पो. नि. वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई संजय पवार हे करीत आहे.