झगडे फाटा परीसरात साडेतीन टन गोमांस जप्त

झगडे फाटा परीसरात साडेतीन टन गोमांस जप्त

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी|Kopargav

तालुक्यातील चांदेकसारे हद्दीत झगडे फाट्या जवळ कोपरगाव तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर गोमांस आढळून आले.

3.50 टन वजनाचे व 6.75 लाख किमतीचे गोमांस ट्रकसह जप्त करण्यात आले. याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चालक पसार झाला आहे.

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील झगडे फाट्याजवळ पहाटे 6 वाजेच्या सुमारास एक ट्रक बंद पडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस असल्याची गोपनीय माहिती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.

त्यांनी याबाबत पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे व त्यांच्या पथकाला तातडीने घटनास्थळी रवाना केले असता त्यांना घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार एक ट्रक क्र.एम.एच.13 आर. 7319 हा उभ्या स्थितीत आढळून आला. व त्यावरील चालक मात्र पसार झालेला होता.

ट्रकमध्ये अज्ञात प्राण्यांच्या मांसाचा वास येत असल्याने पोलिसांनी पोहेगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत साखरे यांना तातडीने पाचारण केले व त्याबाबत अभिप्राय मागितला असता सदरची ट्रक हा गोमांसाची असल्याचे उघड झालेे. पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन त्यातील गोमांस अंदाजे किंमत 1 लाख 75 हजार रुपये किमतीचे जप्त केले. चांदेकसारे ग्रामपंचायतीला सांगून त्याची विल्हेवाट लावली आहे. (पान 4 वर)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com