कोपरगाव हादरलं! भर बाजारात तरुणाचा निर्घृण खून

कोपरगाव हादरलं! भर बाजारात तरुणाचा निर्घृण खून

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बाजार तळात सोमवारच्या बाजारात 7 ते 8 जणांनी रॉड, गज व दगडाने ठेचून तरुणाची हत्या केल्याची घटना घडली. राजा भोसले असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो शिंगणापूर येथील रहिवासी आहे.

कोपरगाव हादरलं! भर बाजारात तरुणाचा निर्घृण खून
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

हल्ला झाल्यानंतर राजा भोसले याला शहरालगत असलेल्या जनार्धन स्वामी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले आहे. याप्रसंगी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान मयताच्या नातेवाईकांनी जनार्दन स्वामी रुग्णालयात एकच गर्दी केली. यावेळी जमाव प्रचंड आक्रमक झाल्याने त्यांनी रुग्णालयाच्या दर्शनिक भागाच्या काचा फोडल्या. तसेच रुग्णवाहिकेची देखील तोडफोड केली.

कोपरगाव हादरलं! भर बाजारात तरुणाचा निर्घृण खून
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?
Title Name

ही हत्या कशामुळे झाली याचे कारण अद्याप समज शकले नाही. घटनास्थळी शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी भेट दिली. हल्लखोरांपैकी दोघांना पोलसांनी ताब्यात घेतले असून उर्वरीत आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली. दरम्यान रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

कोपरगाव हादरलं! भर बाजारात तरुणाचा निर्घृण खून
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com