सराईत गुन्हेगार पठारेचा एकावर चाकू हल्ला

सुडके मळ्यातील घटना : चौघांविरूद्ध गुन्हा
सराईत गुन्हेगार पठारेचा एकावर चाकू हल्ला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सराईत गुन्हेगार विजय पठारे याने बुधवारी दुपारी एकावर चाकूने हल्ला करून त्याला मारहाण केली. दिनेश मनोहर पंडित (वय 36 रा. सिध्दार्थनगर) असे मारहाण झालेल्याचे नाव आहे. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विजय राजू पठारे (रा. सिध्दार्थनगर), संतोष नवगिरे (रा. कल्याणरोड, नगर), गणेश सुरेश पठारे व विजय पठारेचा एक मित्र यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिध्दार्थनगरमधील सुडके मळ्यात ही घटना घडली.

बुधवारी दुपारी फिर्यादी घरासमोर बसलेले असताना गुन्हेगार पठारे हा दुचाकीवरून त्याच्या साथीदारांना घेऊन तेथे आला. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. विजय याने त्याच्या हातातील चाकूने फिर्यादी यांच्यावर हल्ला केला. चाकू हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी पठारेसह त्याच्या साथीदारांनी बालिकाश्रम रोडवरील दोन दुकानांत तोडफोड केली होती. त्याच्या काही साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी पुन्हा पठारे याने नगरमध्ये येत दहशत निर्माण केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com