विनापरवाना फटाक्यांचा स्टॉल; पोलिसांकडून गुन्हा दाखल

विनापरवाना फटाक्यांचा स्टॉल; पोलिसांकडून गुन्हा दाखल

कर्जत | प्रतिनिधी

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करत विनापरवाना फटाका स्टॉल (Firecracker stall) लावून स्फोटकांचा साठा केल्याप्रकरणी कर्जत (karjat) तालुक्यातील कोरेगाव (koregoan) येथील फटाका स्टॉल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे कालिदास शहाजी घालमे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. परवाना विभागाकडून फटाके विक्री करण्याचा परवाना न घेता त्यांनी अनधिकृतरित्या कोरेगाव येथे फटाक्याचा स्टॉल लावून स्फोटक पदार्थांचा साठा केला.

यातून जनतेच्या जीवितास धोका निर्माण केल्याने त्यांच्याविरुद्ध कलम २८६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल तिकटे यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com