
कर्जत | प्रतिनिधी
पतीने पत्नीवर केलेल्या चाकूच्या हल्ल्यात पत्नीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना कर्जत (karjat) तालुक्यातील राशीन (rashin) येथे शुक्रवारी सकाळी घडली. याप्रकरणी मयताच्या बहिणीकडून पोलिसात (police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राशीन येथील श्री जगदंबा मंदिर (shri jagdamba mandir) परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. राहुल सुरेश भोसले याने सकाळी पत्नीवर चाकूने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने दिपाली भोसले यांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने तालुका हादरून गेला आहे.
पत्नीवर चाकूने हल्ला करून पती राहुल भोसले हा पळून गेला. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याकडून ग्रामसुरक्षा यंत्रणेचा कॉल देण्यात आला. मात्र आरोपी ग्रामस्थांच्या हाती आला नाही.
आरोपीने अंगात भगव्या रंगाचा शर्ट घातलेला आहे. कर्जत पोलिसांची पथके आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात असल्याचे समजते.