कर्जत पोलिसांचा रथयात्रेत 'ट्रॅप'; १० महिलांसह २० सराईत चोरटे गजाआड

कर्जत पोलिसांचा रथयात्रेत 'ट्रॅप'; १० महिलांसह २० सराईत चोरटे गजाआड

कर्जत | प्रतिनिधी

कर्जत येथील श्री संत सदगुरू गोदड महाराजांच्या रथयात्रेदरम्यान कर्जत पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नियोजनातुन लावलेल्या ट्रॅपमधील सहा तासांमध्ये तब्बल १८ सराईत चोरटे कर्जत पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

गेली दोन वर्षांपासून करोना महामारीमुळे कर्जतची रथ यात्रा भरली नव्हती. मात्र यंदा नागरिकांच्या उच्चांकी गर्दीचा आकडा पार झाला. गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांना लुटण्यासाठी, दागिने, रोकड, चोऱ्या करण्यासाठी असंख्य सराईत चोरटे परजिल्ह्यातून, परगावाहून या यात्रेत सहभागी झाले होते. मात्र चोरट्यांचे मनसुबे कर्जत पोलिसांनी मोडीत काढले.

यंदा रथयात्रेवर २९ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गर्दीवर नजर होती. त्यामुळे टवाळखोरांना आणि गुन्हेगारांना मोठा चाप बसला. चोऱ्या करण्यासाठी विविध जिल्ह्यातून व तालुक्यातून आलेल्या या सराईत चोरट्यांवर अगोदरही अनेक गुन्हे दाखल होते. कर्जत पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल १८ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची नावे अशी : आर्यन अमिताभ निमगावकर (रा. वीजबोर्डाचे पाठीमागे, कर्जत), आनंद रविंद्र पवार उर्फ टकशा (रा.गोरोबा टाकी, जामखेड), काजल कलाकार चव्हाण उर्फ काजल अविनाश काळे (रा. वाकी ता.आष्टी), निर्मला हनुमंत जाधव, हनुमंत मुड्या जाधव (दोघेही रा. लेखानगर नाशिक), अमोल जालिंदर काळे (रा.अरणगाव), किरण रावसाहेब काळे (रा. मिलिंदनगर, जामखेड), सागर ताराचंद भागडे (रा.गोरोबा टाकी, जामखेड), संतोष शंकर चव्हाण (रा.उरुळीकांचन), राहुल रमेश जाधव ( रा. यशवंतनगर, अकलूज), गोवर्धन सुरेश काळे (रा. सदाफुलेवस्ती, जामखेड), कमल बबन फुलवरे, मंगल संभाजी शिंदे, शिला पप्पू फुलवरे (तिघेही रा.गेवराई बीड), रोहिणी सुनील पिटेकर, स्वाती संतोष पिटेकर, राणी शरद पिटेकर, (तिन्ही रा. म्हाळंगी ता. कर्जत), माया प्रवीण गायकवाड, सोनी जगत राकडे, इंदू आनंदा गायकवाड (तिन्ही रा. अशोकनगर, ता. जि.वर्धा).

सर्व आरोपींवर जबरी चोरी, चोरी, चोरीचा प्रयत्न, संशयास्पद परिस्थितीत फिरणे अशा प्रकारचे गुन्हे कर्जत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेले आहेत. यातील पाच आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडी रिमांड सुनावण्यात आले आहे. १२ अटक आरोपींवर अहमदनगर, पुणे, सोलापूर, वर्धा येथे चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. चोऱ्या होण्याच्या अगोदरच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि टीमने चोरटे जेरबंद केल्यामुळे चोऱ्या झाल्या नाहीत.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अनंतराव सालगुडे, पोलीस जवान श्याम जाधव, अंकुश ढवळे, पांडुरंग भांडवलकर, सुनील खैरे, गोवर्धन कदम, शकील बेग, ईश्वर नरोटे, कोमल गोफणे, राणी व्यवहारे, बळीराम काकडे, जयश्री गायकवाड, भरत डगोरे, सलीम शेख, उद्धव दिंडे, प्रवीण अंधारे, शाहुराज तिकटे यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com