महिलेस लुटणारा जलालपूरचा 'राजू' पोलिसांकडून जेरबंद

महिलेस लुटणारा जलालपूरचा 'राजू' पोलिसांकडून जेरबंद

कर्जत | प्रतिनिधी | Karjat

महिलेला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या एकास कर्जत पोलिसांनी (Karjat Police) जेरबंद केले आहे....

याबाबत सविस्तर माहिती अशी की, १८ जून रोजी सायंकाळी ४ वाजता एक महिला तिच्या मुलासोबत श्रीगोंदा (Shrigonda) येथून भांबोरा (Bhambora) येथे तिच्या बहिणीच्या घरी मोटरसायकलवरून जात होती. कर्जत तालुक्यातील जलालपूर गावाच्या शिवारात सटवाई वस्तीजवळ रस्त्यात पाऊस लागल्याने ते एका बाभळीच्या झाडाखाली आडोशाला थांबले होते. त्या ठिकाणी मोटरसायकलवर (Motercycle) अज्ञात २० ते २५ वर्षाचे दोन इसम आले व चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील ३०००० रुपये किमतीचे साडेसात ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओढून घेऊन निघून गेले.

पोलीस स्टेशन तक्रार दाखल होताच, कर्जत पोलीस ठाण्याचे (Karjat Police Station) अधिकारी व जवान यांनी घटनास्थळी भेट देऊन अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला. कर्जत पोलिसांना त्या परिसरातील गुन्हेगार व वर्णनावरून आरोपीचा शोध घेत असताना बातमी मिळाली की हा गुन्हा राजु रमेश चव्हाण याने केला आहे. त्यानुसार पहाटे जलालपूर (Jalalpur) शिवारात कोंबींग ऑपरेशन करुन राजू रमेश चव्हाण (वय २१ वर्ष, रा. जलालपूर, ता. कर्जत) यास पकडले असुन त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. या आरोपीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचा पुडील तपास पोलीस अंमलदार मारुती काळे हे करीत आहेत.

उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने, पोलीस अंमलदार अंकुश ढवळे, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनिल खैरे, गोवर्धन कदम, गणेश ठोंबरे, सागर म्हेत्रे, चालक शकील बेग यांनी ही कारवाई केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com