स्वस्तात किराणा माल देतो म्हणून लाखोंची फसवणूक

गुन्हा दाखल
स्वस्तात किराणा माल देतो म्हणून लाखोंची फसवणूक

कर्जत | प्रतिनिधी

स्वस्तात किराणा माल देतो असे म्हणून टप्प्याटप्प्याने लाखो रुपयांची रक्कम बँकेच्या खात्यावर भरण्यास सांगितले.

मात्र किराणा माल न देता फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनमध्ये (karjat police staion) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, पाटील मंडळ, ता. नगर येथील जयसिंग मुरारराव तोडमल यांना किराणा माल स्वस्तात देतो असे सांगण्यात आले. त्यानुसार तोडमल यांनी टप्प्याटप्प्याने ४ लाख ६९ हजार ८५० रुपये आरटीजीएस करून भरले.

मात्र रक्कम भरल्यानंतर त्यांना किराणा माल न दिल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. कर्जतच्या महाराष्ट्र बँक (maharashtra bank) शाखेतून हे पैसे भरण्यात आले. फसवणुकीचा प्रकार निदर्शनास येताच तोडमल यांनी कर्जत पोलीस स्टेशन गाठले.

याप्रकरणी वैभव अरुण सोनटक्के (रा. एमआयडीसी चौक, भिगवण रोड, बारामती) व विशाल मारे (रा. डाळज नंबर १, ता. इंदापूर) यांच्याविरुद्ध कलम ४०६, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक अंधारे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com