कुळधरणमध्ये भरदुपारी घरफोडी; सोन्याचे दागिने लंपास

कुळधरणमध्ये भरदुपारी घरफोडी; सोन्याचे दागिने लंपास

कर्जत | प्रतिनिधी | Karjat

कर्जत (Karjat) तालुक्यातील कुळधरण (Kuldharan) येथे कोपर्डी रोडलगत (Kopardi Road) राहणाऱ्या दादा उत्तम शिंदे (Dada Uttam Shinde) यांच्या घरी शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घरफोडी झाली.

कुळधरणमध्ये भरदुपारी घरफोडी; सोन्याचे दागिने लंपास
खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा कोठडीत मृत्यू

घराची कडी उघडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे दागिने (Gold jewelry) लंपास केले. दोन अंगठ्या, बदाम, नथ, झुबे असे सुमारे अडीच तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी लांबविले.

या घटनेबाबत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव (Police Inspector Chandrasekhar Yadav) यांना तात्काळ संपर्क करण्यात आला. यादव यांनी पोलीस कॉन्स्टेबल सुनील माळशिकारे व विकास चंदन (Police Constable Sunil Malshikare and Vikas Chandan) यांना घटनास्थळी दाखल केले. पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. दादा शिंदे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस कर्जत पोलीस (Karjat Police) करत आहेत.

कुळधरणमध्ये भरदुपारी घरफोडी; सोन्याचे दागिने लंपास
रांजणगाव खुर्दमध्ये अपहरण करून तरुणाला बेदम मारहाण

लोकजागृतीची गरज

कर्जत तालुक्यात (Karjat Taluka) भर दुपारी घरफोड्यांचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. काही दिवसांपूर्वीच याबाबत वृत्त प्रसिद्ध करून लक्ष वेधले होते. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी या बातमीमधून नागरिकांनी घराला, कपाटाला कुलूप लावावे, शेजार्‍यांना घरावर लक्ष ठेवण्यास सांगावे अशा विविध उपाययोजना सांगितल्या होत्या. मात्र नागरिकांमध्ये यामध्ये अधिक जागृतता होण्याची गरज अधोरेखित होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com