भावकीच्या भांडणात मदत केल्याच्या रागातून मारहाण; दोन गंभीर जखमी

सात जणांवर गंभीर गुन्हे दाखल
भावकीच्या भांडणात मदत केल्याच्या रागातून मारहाण; दोन गंभीर जखमी

जामखेड | तालुका प्रतिनिधी

गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या एका वादात फिर्यादीच्या मित्राने केलेल्या मदतीचा राग मनात धरून शुक्रवारी दि. २४ रोजी रात्री तालुक्यातील साकत येथे फिर्यादी व मित्रावर जोरदार हल्ला करण्यात आला. यामधे महेश भागवत लहाने व फिर्यादी पांडुरंग अडसुळ हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

भावकीच्या भांडणात मदत केल्याच्या रागातून मारहाण; दोन गंभीर जखमी
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील साकत येथे गेल्या अनेक दिवसांपासून काही ना काही कारणांवरून भावकीत दोन गटात सतत भांडणे होत होती. त्याच अनुषंगाने दि. २४ रोजी रात्री एका भांडणात फिर्यादीच्या मित्राने फिर्यादीस मागील एका भांडणात केलेल्या मदतीचा राग मनात धरून फिर्यादी व त्यांचे मित्राला तलवार, कुऱ्हाड, कोयता व काठीने मारहाण करण्यात आली या मारहाणीत ते दोघेही गंभीर जखमी झाले.

भावकीच्या भांडणात मदत केल्याच्या रागातून मारहाण; दोन गंभीर जखमी
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

या प्रकरणी पांडुरंग नागनाथ अडसुळ (वय ३३) याच्या फिर्यादीवरून गावातील जगन्नाथ उर्फ दादा पोपट अडसुळ, ज्ञानेश्वर पोपट अडसुळ, भाऊसाहेब चत्रभुज मुरुमकर, पप्पू अश्रू अडसुळ, बाळू हनुमंत अडसुळ, हनुमंत विष्णू अडसुळ, पोपट बापुराव अडसुळ या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

भावकीच्या भांडणात मदत केल्याच्या रागातून मारहाण; दोन गंभीर जखमी
मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

हि घटना जामखेड तालुक्यातील साकत ग्रामपंचायत कार्यालय परिसरात घडली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे करत आहेत.

भावकीच्या भांडणात मदत केल्याच्या रागातून मारहाण; दोन गंभीर जखमी
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?
भावकीच्या भांडणात मदत केल्याच्या रागातून मारहाण; दोन गंभीर जखमी
सुष्मिता सेन आणि रोहमन शॉलचे ब्रेकअप; पण...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com