फरार आरोपीला जामखेड पोलिसांनी केली अटक

फरार आरोपीला जामखेड पोलिसांनी केली अटक

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

ग्रामपंचायत निवडणुक 2021 मध्ये मतदान करण्यासाठी जामखेड तालुक्यातील खांडवी गावातील फरार आरोपी शरद गुलबाशा भोसले रा.खांडवी ता.जामखेड हा मतदान करण्यासाठी येणार आहे.

अशी खात्रीशीर बातमी जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाल्याने त्यांनी लगेच खांडवी बुथवर ड्युटी करणारे पो.कॉ.रोहिदास गुंडाळे नेम-कोतवाली पोलीस स्टेशन व होम.अरुण पोटे नेम.नगर तालुका होमगार्ड पथक तसेच खांडवी गावातील पोलीस पाटील संतोष बापुराव डिसले व डी.बी.पथकातील सपोनि.महेश जानकर,पोकॉ.संग्राम जाधव, पोकॉ.आबासाहेब आवारे,पोकॉ.संदिप राऊत,पोकॉ.अरूण पवार यांना सदर मिळालेल्या बातमीतील आरोपी शदर भोसले यास ताब्यात घेण्यासाठी कळवले होते.

आरोपी शरद भोसले हा मतदान केंद्रात जावुन मतदान करून बाहेर आल्यानंतर त्याला काही अंतरावर पोलीसांनी जागीच पकडले आरोपी विरूद्ध जामखेड पोलीस स्टेशन ला गु.र.नं. 743/2020 भा.द.वि कलम 307, 504, 506 प्रमाणे गुन्हयात फरार होता. त्याचेवर या अगोदर जामखेड पोलीस स्टेशनला यापुर्वीही भादवि कलम 302, 307, 354 सारखे गंभीर गुन्हे दाखल असुन तो जामिनावर सुटलेला आहे.

या गुन्हयात आरोपी पकडण्यासाठी पोलीस पाटील संतोष डिसले यांनी खास मदत केली असल्याने त्यांचे कर्जत विभागाचे पोलीस उपधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी अभिनंदन केले. जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले की, अशा प्रकारे प्रत्येकाने आपली जबाबदारी समजुन पोलीसांना सहकार्य केल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर आळा बसण्यास मदत होईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com