पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह ९ जणांविरोधात गुन्हा

पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह ९ जणांविरोधात गुन्हा

जामखेड l तालुका प्रतिनिधी

घर बांधणे व पोल्ट्री फर्मच्या शेडसाठीच्या कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी माहेरुन ५ लाख रुपये घेऊन ये असे बोलून विवाहितेचा गेल्या ७ वर्षांपासून वारंवार छळ केला जात होता. अखेर या छळास कंटाळून विवाहितेने जामखेड पोलीस स्टेशनला (jamkhed police station) दिलेल्या फिर्यादीवरून सासरकडील एकुण ९ जणांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Married womens persecution for rs five lakh)

याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत विवाहित ही मुळ रा. बेलवंडी स्टेशन. ता श्रीगोंदा (हल्ली रा. हळगाव ता. जामखेड) हीचे २०१३ रोजी लग्न झाल्यानंतर आपल्या सासरी बेलवंडी स्टेशन ता. श्रीगोंदा या ठीकाणी रहात होती. या नंतर तीचा सासरकडील पती सतिश महादु लाढाणे, दिर अनिल महादु लाढाणे, सासरे महादु किसन लाढाणे, सासु हौसाबाई महादु लाढाणे, उषा अनिल लाढाणे, किसन बाळु लाढाणे, व आणखी एक (सर्व.रा. बेलवंडी, ता. श्रीगोंदा) व चांगुणाबाई बबन कापसे, बबन बापु कापसे दोघे (रा. हळगाव ता. जामखेड) हे फिर्यादी विवाहितेस सासरी नांदत असताना म्हणत होते की, तुला नांदायचे असेल तर घर बांधण्यासाठी माहेरुन ३ लाख व पोल्ट्री शेडचा हप्ता फेडण्यासाठी २ लाख असे एकुण ५ लाख रुपये घेऊन यावेत, यासाठी मानसिक व शारीरिक छळ केला.

यास कंटाळून अखेर पिडीत विवाहित महिलेने या छळास कंटाळून जामखेड पोलीस स्टेशनला दि ७ ऑक्टोबर रोजी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन सासरकडील एकुण नऊ जणांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक साठे हे करत आहेत.

Related Stories

No stories found.