धक्कादायक! व्याजाच्या पैशासाठी ठेवले डांबून, सावकार पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल

धक्कादायक! व्याजाच्या पैशासाठी ठेवले डांबून, सावकार पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल

जामखेड | तालुका प्रतिनिधी

व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी अपहरण करुन डांबून ठेऊन जमीन लिहून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सावकार पती-पत्नी विरोधात अपहण, सावकारी, मारहाणीचा गुन्हा जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्राकंडुन मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी म्हटले आहे की 'आम्ही मजुरी करून जीवन जगत आहे. सुमारे सहा महिन्यांपुर्वी खाजगी सावकार सुंदर काळे (रा.जामखेड) यांचेकडून १ लाख ३० हजार रूपये २० टक्के व्याजदराने घेतले होते. आजपर्यंत ६० हजार रूपये दिले आहेत. एक महिन्यापूर्वी सुंदर काळे व त्याची पत्नी आमच्या राहते घरात घुसून आम्हाला घरातून बळजबरीने बाहेर काढून रिक्षामध्ये घेवून गेले.

जामखेड शहरातील बीडरोड बैलबाजार येथील राहते घरामधील एका खोलीत डांबुन ठेवले. दुसर्‍या दिवशी सकाळी ११ वा वकीलाकडून आम्हा पती पत्नीकडून आमच्या मालकीच्या जमीनीचे बळजबरीने नोटरी करून घेतली. नंतर आठ दिवसांनी व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी सावकार पती-पत्नीने सकाळी ६ च्या सुमारास आमचे राहते घरात घुसून मला व माझे पतीला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस आय गाडे करत आहेत.

Related Stories

No stories found.