भरदिवसा घरफोडी; १ लाख ५५ हजारांचा ऐवज लंपास

भरदिवसा घरफोडी; १ लाख ५५ हजारांचा ऐवज लंपास

जामखेड | तालुका प्रतिनिधी

जामखेड (Jamkhed) तालुक्यातील पिंपरखेड (Pimparkhed) येथील ढवळे वस्तीवर दुपारी १२: ०० वाजण्याच्या सुमारास घरफोडीची (Burglary) मोठी घटना घडली आहे.

पिंपरखेड (Pimparkhed) येथील ढवळे कुटुंब आपल्या शेतात गेले असता बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी घरातून १ लाख २५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि ३० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख ५५ हजार रुपये किंमतीेचा ऐवज लंपास केला आहे. (Jamkhed Crime News)

ढवळे कुटुंबातील सर्वजण शेतातील लिंबाच्या बागेत लिंबू काढण्याासाठी घराला कुलुप लावुन गेले होते. बागेतून काढलेले लिंबू घरी घेऊन आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास हि बाब आली. घराचे कुलूप तोडून कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलीस स्टेशनचे (Jamkhed Police Sation) पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. तसेच अहमदनगर (Ahmednagar) येथून श्वान पथक व ठसे तज्ञ यांना ही पाचारण करण्यात आले होते. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर हे करत आहे.

जामखेड तालुक्यातील नागरिकांनी आपआपल्या घरी व दुकानांमध्ये चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी सतर्क राहावे. तसे ग्रामसुरक्षा यंत्रणा आपल्या मोबाईलमध्ये इनस्टाॅल करावी. यासाठी आपल्या गावातील ग्रामपंचायत येथे संपर्क करावा.

संभाजी गायकवाड, पोलीस निरीक्षक, जामखेड पोलिस स्टेशन

Related Stories

No stories found.