पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

जिल्ह्यातील 'या' गावात घडली घटना

कर्जत|प्रतिनिधी

पत्नीच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करून तिचा खून केला. त्यानंतर पतीने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे शुक्रवारी (दि.३०) रात्री घडली. नवऱ्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

मयत पत्नीचे नाव योगिता गजरमल आहे. पती राहुल दिलीप गजरमल (वय ३०) याने हे दुष्कृत्य केले. या दुर्दैवी घटनेने कुळधरण हादरून गेले आहे. सध्या करोनाच्या संकट काळात कुटुंबातील सदस्यांची काळजी घेत कौटुंबिक नाती घट्ट होत आहेत. जीव वाचवण्यासाठी रुग्णांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. मात्र विपरीत बुद्धीने केलेल्या या दुष्कृत्याने पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासला गेला आहे.

Title Name
तरसाच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी
पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

घटनेची माहिती समजताच पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट, पोलीस कर्मचारी भाऊसाहेब यमगर, सुनील माळशिकारे, पोलीस पाटील समीर जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. कर्जत पोलीस पुढील तपास करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com