अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

शहरातील एका हॉटेल व्यवसायिकला हर्बल प्रॉडक्ट खरेदीच्या बहाण्याने चार नायजेरियन व्यक्तींनी 14 लाख 17 हजार 500 रूपयाला गंडा घातला आहे.

याप्रकरणी नगर सायबर पोलिसांनी पुण्यातून चौघा नायजेरियन व्यक्तींना अटक केली आहे. स्टॅन्ली स्मिथ, निलम गिरिषगोहेल ऊर्फ निशा शहा, अॅलेक्स पॉवर ऊर्फ मार्क, अॅलेक्स ऊर्फ मिराकेल (सर्व मुळ रा. नायजेरियन, हल्ली रा. पुणे) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.

नगर शहरातील एका हॉटेल व्यवसायिकाची सोशल मीडियावर काही व्यक्तीसोबत मैत्री झाली. भारतातील हर्बल प्रोडॉक्ट कंपनीकडून आर्युवेदिक कच्चा माल खरेदी करण्याचा बहाणा या व्यक्तीने केला. विविध बँकेचे पाच खात्यांची खोटी ओळख त्या व्यक्तींनी हॉटेल व्यवसायिकाला सांगितली. व्यवसायिकाचा विश्वास बसल्याचे पाहून खरेदी प्रक्रिया सुरू केल्याचे भासवत विविध कारणांसाठी पैसे उकळण्यास सुरवात केली.

बनावट ईमेल आकाऊंटवरून बनावट कागदपत्रे पाठवून आरोपी विश्वास संपादन करीत राहिले. विविध कारणांसाठी त्याने व्यवसायिकाकडून 14 लाख 17 हजार 500 रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे व्यवसायिकाच्या लक्षात आले. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, उपनिरीक्षक प्रतिक कोळी यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून आरोपींचा ठावठिकाणा काढला. पुणे येथे एक पथक पाठवून चौघा आरोपींना अटक केली आहे.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक साळवे, उपनिरीक्षक कोळी यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, विशाल अमृते, राहुल हुसळे, गणेश पाटील, राहुल गुंडू, अमोल गायकवाड, अभिजीत अरकल, अरूण सांगळे, वासुदेव शेलार, भागवत, सविता खताळ, पुजा भांगरे, प्रितम गायकवाड, उर्मिला चेके, दिपाली घोडके, सिमा भांबरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.