महामार्गावरील वाहनचालकांना लुटणारी टोळी जेरबंद

एका आरोपीवर चोरी लूटमारीचे विविध पोलिस ठाण्यांमध्ये सोळा गुन्हे
महामार्गावरील वाहनचालकांना लुटणारी टोळी जेरबंद

देवगड फाटा | वार्ताहर

नेवासा पोलिसांनी रात्रीच्या वेळी महामार्गावरील वाहनचालकांना लुटणारी टोळी जेरबंद केली.

याबाबत माहिती अशी की, 15 जुलै 2021 रोजी अमरावती येथील डॉ. सतीश विधळे परिवारासह पुण्याकडे जात असताना त्यांची कार प्रवरासंगमजवळ पंक्चर झाली. ते रस्त्याच्या कडेला गाडीचे चाक बदलत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी देऊन बळजबरीने त्यांच्याकडील दहा हजार रुपये रोख रक्कम, तीन मोबाईल व सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले होते.

या घटनेचा तपास करताना नेवाशाचे पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांनी सायबर क्राईम पथकाच्या मदतीने तपास केला. त्यातून सचिन ठकसेन काळे व राहुल बाळू खिलारे रा. वाळुंज या दोघांना अटक केली. सचिन काळे याच्यावर चोरी लूटमारीचे विविध पोलिस ठाण्यांमध्ये सोळा गुन्हे दाखल आहेत.

Related Stories

No stories found.