पाथर्डीत गांजाची शेती; तीन ठिकाणी पोलिसांचे छापे

लाखो रुपयांचा गांजा जप्त
पाथर्डीत गांजाची शेती; तीन ठिकाणी पोलिसांचे छापे

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी शिवारात शेतात लावलेल्या गाज्यांच्या झाडांवर पोलिसांनी बुधवारी रात्री कारवाई केली.

कारवाईत लाखों रुपयांचे गाज्यांची झाडे जप्त करण्यात आली आहे. तीन ठिकाणी हे छापे टाकले आहे. बुधवारी रात्री शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व पाथर्डी पोलीस पथकाने गांजा असलेले झाडे लावलेल्या शेतात छापा घातला. पाथर्डी पोलीस ठाण्यात गांजा किती आहे, त्याची मोजामाप रात्री उशिरापर्यंत पोलीस करत होते.

त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार येईल अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, एकनाथवाडी शिवारात तीन ठिकाणी गांजा शेती पिकवली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तीन ठिकाणी छापे टाकले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com