पोलिस असल्याचे सांगून फसवणूक; लांबवली सोन्याची अंगठी

बेलापूर येथील घटना
पोलिस असल्याचे सांगून फसवणूक; लांबवली सोन्याची अंगठी

श्रीरामपूर | प्रतिनिधी

पोलिस (Police) असल्याचे सांगून एकाच्या हातातील एक तोळा सोन्याची अंगठी (Gold RIng) लांबविल्याची घटना बेलापूर (Belapur) येथे बायपास रोडवर (Bypass Road) घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सूरू होते. आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

बेलापूर (Belapur) गावातील गोरख कुर्हे हे सायकलवरून गावात येत असताना मोटारसायकल वरून आलेल्या दोघा जणांनी त्यांना अडविले. आम्ही पोलिस असून गांजाची गाडी येत असून ती पकडायची आहे. वरीष्ठ पोलीस अधिकारीही येत आहेत त्यामुळे तुमच्याकडीची अंगठी आमच्याकडे द्या, असे ते म्हणाले.

कुर्हे यांनी घाबरून एक तोळे वजनाची अंगठी त्यांना दिली. अंगठी घेऊन ते दोघे मोटारसायकल वरून श्रीरामपूरच्या दिशेने पसार झाले. कुर्हे यांनी तातडीने बेलापूर पोलिसांना (Belapur Police) माहिती दिली पोलिसांनी शोध घेतला परंतु ते पसार होण्यास यशस्वी झाले. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com