बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगणारा आरोपी अटकेत

बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगणारा आरोपी अटकेत

राहुरी | प्रतिनिधी

विक्री करण्याचे उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने (Ahmednagar LCB) कारवाई करून राहुरी (Rahuri) परिसरातून अटक केली आहे.

या कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) प्रेम पांडूरंग चव्हाण, (वय-३७ वर्षे) या आरोपीस अटक (Accused arrested) केली असून त्याच्याकडून पोलिसांना एक गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस असा एकूण ३१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अहमदनगर, दिपाली काळे अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर आणि संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधीकारी श्रीरामपूर विभाग, अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com