शेवगाव : गावठी पिस्टलसह दोन जणांना अटक
सार्वमत

शेवगाव : गावठी पिस्टलसह दोन जणांना अटक

Arvind Arkhade

शेवगाव|तालुका प्रतिनिधी|Shevgav

तालुक्यातील बोधेगावकडून पाथर्डीकडे जाणारे रोडवर शिंगोरी या गावाच्या शिवारात बालाजी टेकडीजवळ दोन आरोपींना गावठी बनावटीच्या पिस्टलसह पकडण्याची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या पथकाने केली.

शेवगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांना गुप्त बातमीदारामार्फत दोन जण गावठी पिस्टलसह बोधेगावकडून पाथर्डीकडे जाणारे रोडवर थांबल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.

या माहितीवरून दि. 31 रोजी पहाटेच्या सुमारास बोधेगावकडून पाथर्डी कडे जाणारे रोडवर शिंगोरी या गावाच्या शिवारात बालाजी टेकडीजवळ योगेश विष्णू गोसावी (बोधेगाव) व ज्ञानेश्वर मातंग (हातगाव) हे लाल रंगाची बिगर नंबरची हिरो एच एफ डीलक्स मोटारसायकल वरून जात असताना त्याचे कब्जातील विनापरवाना एक गावठी बनावटीचे पिस्टल एक जिवंत काडतूस बाळगून ते पाथर्डीकडे घेऊन जात असतांना पथकाने पकडले.

त्यांच्याविरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशनला आर्म अ‍ॅक्ट कायदा कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, पोलीस अधीक्षक सागर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे सूचनेप्रमाणे उपविभागीय कार्यालय शेवगाव येथील पो ना चंद्रकांत कुसारे, पो कॉ ज्ञानेश्वर इलग, वसंत फुलमाळी, संदीप चव्हाण यांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com