50 लाखाची फसवणुक केल्याप्रकरणी एकास अटक

50 लाखाची फसवणुक केल्याप्रकरणी एकास अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मयत झालेल्या जमीन मालकाच्या जागी तोतया जमीन मालक दाखवून खरेदीदारांची 50 लाखाची फसवणूक (fraud) केल्याप्रकरणी ऋषभ भंडारी (रा. स्टेशन रोड, नगर) याला कोतवाली पोलिसांनी अटक (Kotwali Police station ) केली आहे. तो एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. याप्रकरणी महेश संचेती (रा. विनायकनगर) यांनी 16 जानेवारीला कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद दिली आहे.

भंडारी (Bhandari) याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ( Court ) त्याला 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ( Police cell ) ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जून 2019 मध्ये वाळूंज (ता. नगर) येथील जागेचा व्यवहार महेश संचेती व ऋषभ भंडारी यांच्यामध्ये ठरवून त्यापोटी संचेती यांनी 50 लाख रुपयांचे साठे खत केले होते. मात्र काही दिवसातच सदर जमिनीचे मूळ मालक हे 2018 सालीच मयात झाले असून त्यांच्या जागी ऋषभ भंडारी याने तोतया जागा मालक उभे करून बनवत साठे खत केले असल्याचे निदर्शनास आले.

संचेती ( Sancheti ) यांनी भंडारी याच्याकडे साठे खताचे 50 लाख रुपये परत मागितले. मात्र भंडारी याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर संचेती यांनी भंडारी व त्यांच्या साथीदारांवर कोतवालीत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर भंडारी पसार झाला होता. कोतवाली पोलिसांनी त्याला शुक्रवारी सायंकाळी अटक (Arrested) केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com