पाठविले फटाके निघाल्या पाणी बॉटल

व्यावसायिकाची १ लाख ८५ हजारांची फसवणूक
पाठविले फटाके निघाल्या पाणी बॉटल

अस्तगाव (वार्ताहर)-

पाठविले फटाक्याचे पार्सल आणि निघाल्या पाणी बॉटल! परराज्यातील कथित व्यापाऱ्यांनी साकुरी येथील एका व्यावसायिकाची १ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

या फसवणूक प्रकरणी कृष्णा शर्मा रा. रायपूर छत्तीसगढ, राज जटाव रा. सुतार खेडी, गुजर खेडा ता. महु, जिल्हा इंदोर राज्य मध्यप्रदेश, दिपशे भासले रा. मयुरनगर, मुसाखेडी इंदोर राज्य मध्यप्रदेश या तिघांवर राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर २४६/२०१२१ भादवि कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. साकुरी येथील चेतन लक्ष्मण रणमाळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

यातील आरोपी यांनी फिर्यादी चेतन रणमाळे यांना फोन करुन तुम्ही दिवाळीमध्ये फटाक्याचा व्यावसाय करत आहात. असे मला समजले असून माझ्याकडील योग्य भावात होलसेल माल आहे, असे सांगून फिर्यादी चेतन रणमाळे यांच्याशी व्यवहार करून पॉपपॉप क्रॅकर्स (फटाके) ४४ पेटी पार्सल पाठविली आहे, असे सांगुन त्याची बिल्टी व ट्रान्सफरचे खोट्या व बनावट पावत्यांचे फोटो व्हॉट्सअॅपद्वारे पाठवून फिर्यादीस फोन करुन त्यांचेकडून वरीलप्रमाणे १,८५,००० रुपये रक्कम अकाऊंटवर ट्रान्सफर करून घेऊन त्यांना पाणी बॉटलचे बॉक्स पार्सल पाठवून त्यांची फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राहाता पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पगारे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com