राहात्यात ५ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

राहात्यात ५ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

राहाता (वार्ताहर)

९३ लाखांचा जमिनीचा व्यवहार करून व्यवहाराचे पैसे न देता जमीन मालकाला धमकावून जमीन नावावर करून घेतल्याप्रकरणी राहाता पोलिसांत ५ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. राहाता तालुक्यात केलवड शिवारात ही घटना घडली.

याबाबत अलका रामा गोडगे (वय ५५) रा. लक्ष्मीनगर मुंबई यांनी राहाता पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी राहाता तालुक्यातील केलवड खुर्द गावात गट नंबर ३ मध्ये २ एकर जमीन असून त्यावर माझा ताबा आहे. सदर जमिनीत माझे नातेवाईक पीक घेतात. मला नवीन घर खरेदी करायचे असल्याने व त्यासाठी मला पैशाची आवश्यकता आहे. म्हणून मी सदर जमिनीची विक्री करण्याचे ठरवले. त्यासाठी माझे ओळखीचे राजेश नागेश वाघमारे व त्यांची पत्नी संगीता राजेश वाघमारे, रा. टिळकनगर, चेंबूर, मुंबई यांचेशी संपर्क करून जमीन विक्री करण्याबाबत माहिती दिली. त्यांनी तुम्हाला जमीन विकून देतो व त्याबदल्यात चांगला मोबदला देतो, असे आश्वासन दिले. माझ्याकडून सदर जमिनीचे कागदपत्र घेतले.

राहात्यात ५ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
Irrfan Khan Birth Anniversary : आठवणीतला इरफान खान…

त्यानंतर २२ डिसेंबर रोजी राजेश वाघमारे याने मला फोन केला की, तुमच्या जमीन खरेदी करण्यासाठी पार्टी पाहिली आहे. तुम्ही उद्या नाशिकला हॉटेल पवन येथे या, असे सांगितले, त्याप्रमाणे मी व माझा मुलगा प्रशांत आम्ही दोघे हॉटेल पवन येथे गेलो. तेव्हा राजेश याने आमच्या अगोदरच तिथे हजर असलेल्या दीपक मुरलीधर पगारे व सुदर्शन जगन्नाथ जाधव दोघे रा. नाशिक यांच्याबरोबर ओळख करून दिली. जमीन विक्रीबाबत त्यांच्याबरोबर आमची बैठक झाली. तेव्हा दीपक पगारे यांनी आमच्याकडून आमचे जमिनीचा ७/१२ उतारा व इतर कागदपत्र घेतली. सध्या आम्ही गडबडीत असून आपण नंतर बैठक घेऊ, असे सांगून ते सर्वजण हॉटेलमधून निघून गेले. २९ डिसेंबर रोजी पुन्हा राजेश वाघमारे याने आम्हाला फोन करून दीपक गवारे व सुदर्शन जाधव या दोघांना - जमीन दाखवणार आहोत तेव्हा तुम्ही तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड व बँकेचे चेकबुक घेऊन या असे मला सांगितले. त्यामुळे मी, माझे पती रामा गोडसे व मुलगा प्रशांत असे आम्ही तिघे नाशिक येथे गेलो व तिथे राजेश यास भेटलो असता त्याने दीपक पगारे यांच्या गाडीमधून आम्हाला येथे आणले. जमीन पाहिल्यानंतर दीपक पगारे यांनी मला तुमची जमीन पसंत असून मी ती घेण्यास तयार आहे, असे सांगून केलवड येथे जमिनीवर आमचा व्यवहार होऊन जमिनीची किंमत ९३ लाख अशी ठरली.

व्यवहार झाल्यानंतर आम्ही त्यांना अॅडव्हान्स द्या, अशी विचारणा केली. परंतु त्यांनी दोन टप्प्यात पूर्ण रक्कम देतो, असे सांगून आमच्याकडील असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे २ कोरे चेक व आधार कार्ड, पॅन कार्डची कलर कॉपी वरती स्वाक्षरी करून घेतल्या. तुम्हाला पैसे नंतर देतो असे सांगून निघून गेले. २ जानेवारी रोजी राजेश याने माझ्या मोबाईलवर फोन केला तुम्ही उद्या राहाता येथे या तुम्हाला व्यवहारातील पहिला हप्ता ३० लाख रुपये देतो. असे सांगितल्याने मी, माझे पती व मुलगा असे तिघेजण शिर्डी येथे आलो.

राहात्यात ५ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
Katrina and Vicky : विकी-कतरिनाच्या हळदीचे फोटो पाहिलेत का?

राजेश नागेश वाघमारे, संगीता राजेश वाघमारे, दीपक मुरलीधर पगारे, सुभाष निवृत्ती धात्रक, सुदर्शन जगन जाधव या ५ व्यक्तींनी आम्हाला तिघांना शिर्डी येथे हॉटेलवर नेले. त्या दरम्यान माझा मुलगा प्रशांत साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिरात गेला असता. त्या पाच जणांनी मला व माझ्या पतीला राहाता येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे आणले. आम्ही दोघांनी त्यांना पैशाचे काय झाले अशी विचारणा केली. पैशाची जुळवाजुळव चालू आहे, असे त्यांनी आम्हाला सांगितले. दीपक यांनी माझी कोऱ्या कागदावर सही घेतली. तेव्हा मी तुमचे काय चालले आहे, असे विचारले असता त्याने तुमच्या कागदावर सह्या झाल्या की लगेच तुम्हाला व्यवहाराचा पहिला हप्ता ऑनलाईन ट्रान्सफर करू, असे सांगितले.

मी कागदपत्र वाचण्यास मागितली असता त्याने तुमचा आमच्यावर विश्वास नाही का. आम्ही एवढे पैसे खर्च करून स्टॅम्प खरेदी केले आहे, असे म्हणून अरेरावीची भाषा वापरून आमच्यावर दबाव टाकून तुम्ही जर सह्या करायला तयार झाले नाही तर तुम्हाला जिवे मारून टाकू, अशी धमकी देऊन आम्हाला राहाता दुय्यम निबंधक ऑफिसमध्ये नेले. आमच्या पाठीमागून आमचा मुलगा त्या ठिकाणी आला. त्याने कागदपत्र वाचण्याकरिता मागितले असता. राजेश यांनी आपला नंबर आला आहे. उशीर करू नका असे म्हणून रजिस्टरसमोर येऊन तेथील अधिकाऱ्यांनी आम्हाला कसलाही विचार न करता कागदपत्रावर आमच्या सह्या घेतल्या व फोटो घेऊन खरेदीखत करून घेतले.

राहात्यात ५ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
बॉलिवूड सेलिब्रिटी करोनाच्या विळख्यात!

त्यानंतर आम्ही रजिस्टर ऑफिसमधून बाहेर आल्यावर दीपक पगारे यास पहिल्या टप्प्यातील रकमेची मागणी केली असा आम्ही रूमवर गेल्यावर पैसे देतो असे सांगून आम्हाला शिर्डी येथील हॉटेलच्या रूमवर सोडले. त्यानंतर दीपक यास फोन केला असता त्यांनी मी अर्जंट कामासाठी नाशिक येथे आलो असून सदर रकमेचा चेक नाशिक येथे येऊन घेण्यास सांगितले. आम्ही नाशिक येथे गेलो असता तिथे गेल्यावर फोन केला. परंतु दीपक यांनी फोन बंद करून ठेवला होता.

तेव्हा आम्ही नाशिक येथे मुक्काम करून पुन्हा दुसऱ्या दिवशी राहाता येते रजिस्टर ऑफिसमध्ये आलो व ऑफिसमधून खरेदी खताची नक्कल घेतली असता आमच्या लक्षात आले की, दीपक पगारे व त्याच्या सोबत असलेल्या ४ व्यक्तींनी आमच्या जमिनीची किंमत ८ लाख दाखवून सदर जमीन खरेदी करून आमच्याकडून दोन कोऱ्या चेकवर सह्या घेऊन आम्हाला आमच्या जमिनीचा कोणताही मोबदला न देता आमची फसवणूक केली आहे.

राहात्यात ५ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

अलका गोडगे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी राजेश नागेश वाघमारे, संगीता राजेश वाघमारे, दीपक मुरलीधर पगारे, सुभाष निवृत्ती धात्रक, सुदर्शन जगन जाधव या ५ जणांविरुद्ध ९३ लाख रुपयांचा जमीन खरेदीचा व्यवहार करून फसवणूक केल्याप्रकरणी भादंवि कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला असून राहाता पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष पगारे हे सदर घटनेचा तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com