माल वितरणातून जमा झालेल्या तीन लाख रुपये रकमेचा अपहार

अ‍ॅमेझॉन कंपनीच्या प्रोसेस असोसिएटविरोधात गुन्हा
Crime
Crime

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

अ‍ॅमेझॉन कंपनीचे माल वितरणातून डिलेव्हरी बॉय मार्फत जमा झालेली दोन लाख 90 हजार 109 रुपये रकमेचा प्रोसेस असोसिएट म्हणून काम पाहणार्‍या व्यक्तीने अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोयल पठाण (रा. बेलदार गल्ली, तेलीखुंट, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी कंपनीचे कार्यकारी अधिकारी मयूर भीमराव शिंदे (वय 33 रा. दत्तवाडी आकुर्डी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. एनटेक्स ट्रान्सपोर्टेशन सर्विसेस प्रा.लि. या कंपनीमार्फत नगर शहरासह जिल्ह्यात अ‍ॅमेझॉन कंपनीचे शिपमेंट डिलेव्हरी (माल वितरणाचे) काम केले जाते. माल वितरणातून डिलेव्हरी बॉय मार्फत जमा झालेल्या रक्कमेचा हिशोब ठेवून ते पैसे सीएमएस मार्फत कंपनीच्या बँक खात्यात जमा करण्याची जबाबदारी प्रोसेस असोसिएट म्हणून काम पाहणारा पठाण याच्यावर होती.

त्याने 20 ऑक्टोबर 2022 रोजी डिलेव्हरी बॉय यांच्याकडून जमा झालेली दोन लाख 90 हजार 190 रुपयांची रक्कम दुसर्‍या दिवशी 21 ऑक्टोबर, 2022 रोजी सीएमएस मार्फत कंपनीच्या बँक खात्यात जमा न करता 21 ऑक्टोबर, 2022 पासून कामावर गैरहजर राहून रक्कमेचा अपहार केला आहे. म्हणून शिंदे यांच्या फिर्यादीवरून पठाण याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com