बाप-लेक चालवत होते कुंटणखाना, पोलिसांनी टाकला छापा

तीन परप्रांतीय मुलींची सुटका
बाप-लेक चालवत होते कुंटणखाना, पोलिसांनी टाकला छापा

अहमदनगर|Ahmedagar

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून तीन परप्रांतीय मुलींची सुटका केली. तर कुंटणखाना चालविणाऱ्या बाप-लेकांना अटक करण्यात आली आहे.

अनिल माणिकराव कर्डीले (वय 52) व अक्षय अनिल कर्डीले (वय 25 दोघे रा. खंडाळा ता.नगर) अशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिसांनी मंगळवारी रात्री खंडाळ गावाच्या शिवारात नगर- दौडवरील हॉटेल राजयोगमध्ये ही कारवाई केली.

खंडाळ गावाच्या शिवारात हॉटेल राजयोगमध्ये परप्रांतीय मुलींना देहविक्री करण्यासाठी बोलावून कुंटणखाना चालविला जात असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांना मिळाली होती. त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. निरीक्षक सानप यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यामध्ये तीन परप्रांतीय मुली मिळवून आल्या. त्याना स्नेहालय येथे पाठवले आहे. दरम्यान, हाॅटेल मालक व मुलगा याना पिटा कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com