रेल्वेत नोकरी लावून देतो म्हणून दोन तरुणांना दहा लाखाचा गंडा, आरोपी अटकेत

रेल्वेत नोकरी लावून देतो म्हणून दोन तरुणांना दहा लाखाचा गंडा, आरोपी अटकेत

संगमनेर (प्रतिनिधी)

रेल्वेत नोकरी (Railway Job) लावून देतो असे अमिष दाखवून दोन तरुणांना 10 लाखाला गंडा घालणार्‍यास संगमनेर तालुका पोलिसांनी (Sangamner Police) अटक केली आहे. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.

विजयकुमार श्रीपती पाटील (रा. श्रीकृष्ण कॉलनी, कोल्हापूर, हल्ली रा. कंचन कंन्फर्ड प्लॉट नं. 306, निंबाळकर इस्टेट येवलेवाडी कोल्हापूर, जिल्हा पुणे) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदर आरोपीने संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील नितीन गंगाधर जोंधळे यांना रेल्वेत नोकरीला लावून देतो असे अमिष दाखवून त्यांना सेंट्रल रेल्वे मुंबई यांचे नावे बनावट पत्र पाठवून त्यांच्याकडून 5 लाख रुपये घेतले.

नितीन जोंधळे यांना रेल्वेचे पत्र बनावट असल्याचे लक्षात आले व आपली फसवणूक झाल्याचे समजले. तेव्हा त्यांनी विजयकुमार पाटील याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबक 368/2021 भारतीय दंड संहिता 420, 465, 468, 471, 473 प्रमाणे दाखल केला.

तसेच कासारे येथील गोरक्षनाथ लहानु गांडोळे यांची देखील विजयकुमार श्रीपती पाटील याने रेल्वेत नोकरीला लावून देतो म्हणून 5 लाख रुपये घेवून फसवणूक केली होती. गांडोळे यांनी देखील तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विजयकुमार पाटील याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 354/2021 भारतीय दंड संहिता 420, 323, 504, 506, 34 प्रमाणे दाखल केला.

सदर दोन्ही गुन्ह्यांचा तपास तालुका पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी करत आरोपी विजयकुमार पाटील यास अटक केली. तसेच इतर दोन आरोपी रविंद्र कांबळे (रा. कांबळे वस्ती, तासगाव, जि. सांगली, इंगोले पुर्ण नाव माहित नाही (रा. शिक्षक कॉलनी, जिल्हा वर्धा) यांचा पोलीस शोध घेत आहे. सदर फरारी आरोपींनी कुणाचे पैसे घेवून फसवणूक केली असल्यास त्यांनी तात्काळ संगमनेर तालुका पोलीस ठाण्यास संपर्क करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com