सुरेगावात चक्रधर स्वामी मंदिराची दानपेटी फोडली

सुरेगावात चक्रधर स्वामी मंदिराची दानपेटी फोडली
चोरी

कोपरगाव(तालुका प्रतिनिधी )

तालुक्यातील सुरेगाव येथील चक्रधर स्वामी मंदिराच्या सभा मंडपात असलेली दानपेटी फोडून दोन हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील चक्रधर स्वामी मंदिरात दानपेटी बसविण्यात आलेली आहे. सदर दानपेटीवर अज्ञात चोरट्यानी पाळत ठेऊन दि .04 मे च्या रात्री 9 वाजेनंतर तर पहाटे चारच्या सुमारास कधीतरी ती दानपेटी फोडून त्यातील रक्कम रोख दोन हजार रुपये चोरून नेली आहे.

चोरी
दोघांकडून तरूणावर प्राणघातक हल्ला

या बाबत अनंतराज राजधर महानुभव रा.सुरेगाव यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं .144 / 2021 भा.द.वि.कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ.एस.एन.भताने हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com