
अहमदनगर (प्रतिनिधी)
चारचाकी घेण्यासाठी माहेरून दोन लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेचा सासरी छळ करण्यात आला. याप्रकरणी पीडित विवाहितेने नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती प्रमोद दादु गायकवाड, ननंद प्रतिभा दिलीप शिंदे, नंदाई दिलीप शिंदे (पूर्ण नाव माहिती नाही) व भाचा आदर्श दिलीप शिंदे (रा. घोरपडी ता. हवेली जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादीचा विवाह प्रमोद गायकवाड सोबत झाला आहे. विवाहनंतर सन 2016 ते 22 जुलै 2023 दरम्यान पतीसह चौघांनी विवाहितेचा सासरी छळ केला. माहेरून चारचाकी घेण्यासाठी दोन लाख रूपये घेऊन ये, अशी मागणी करून वेळोवेळी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करून घराच्या बाहेर हाकलून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस अंमलदार सरोदे करीत आहेत.