सराईत गुन्हेगार विजय पठारे जेरबंद

तोफखाना पोलिसांनी पुण्यात ठोकल्या बेड्या
सराईत गुन्हेगार विजय पठारे जेरबंद
जेरबंद

अहमदनगर|Ahmedagar

शहरात दहशत निर्माण करून एकावर चाकू हल्ला करणारा सराईत गुन्हेगार विजय राजू पठारे व त्याचा साथीदार करण पाचारणे यांना तोफखाना पोलिसांनी पुण्यातून अटक केली.

तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे व त्यांच्या सोबतच्या पाच कर्मचार्‍यांनी रविवारी रात्री ही कामगिरी केली. तोफखान्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी ही माहिती दिली.

19 मे रोजी दिनेश पंडीत (रा. सिद्धार्थनगर) व यापूर्वी बालिकाश्रम रोडवरील दोन दुकानात दरोडा टाकून दहशत निर्माण करणारा विजय पठारे पसार होता. यापूर्वी त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. परंतु पठारे पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर उपनिरीक्षक मेढे व त्यांच्या पथकाने पठारे व त्याच्या एका साथीदाराला पुण्यात बेड्या ठोकल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com